नाशिक हादरलं! दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर जवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (दि. १९ मार्च २०२५) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या करण्यात आली असून या घटनेनंतर आंबेडकर वाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १७ वर्षीय युवकाचा खून; दोन विधिसंघर्षित बालकांसह ३ आरोपींना ४ तासांत अटक !

उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बोधले नगर जवळच्या आंबेडकर वाडीत हल्लेखोर आले व त्यांनी उमेश उर्फ मन्ना जाधव व त्यांचा भाऊ प्रशांत जाधव या दोघांवर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दोघाही भावांचा जागीच मृत्यू झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: बसस्थानकात दागिने चोरणारे बंटी-बबली जाळ्यात

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शेवटच्या घटकांपर्यंत जलदगतीने सेवा पोहोचवा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790