नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या ज्ञानपीठ सोसायटी समोर रविवारी (ता. १३) रात्री साधारण अकरा ते साडेअकराच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने तलवार व दगड घेऊन दहशत माजवली. त्यांनी केलेल्या हल्ल्यात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी (दि.१३) रोजी रात्री अकराच्या सुमारास सात ते आठ हल्लेखोरांनी जुन्या वादातून ज्ञानगंगा सोसायटीत राहणाऱ्या दोघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रामदास नारायण बोराडे (वय २०, राहणार: ज्ञानगंगा सोसायटी, पांडवलेणी जवळ, नाशिक) याचा मृत्यू झाला. तर राजेश सुदाम बोराडे (वय: 20 वर्षे रा. ज्ञानगंगा सोसायटी, पांडवलेणी जवळ, नाशिक) हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी या टोळक्याने पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित: शौकत फरीद शेख (वय: 19 रा पांडवलेणी), नौशाद हाजी सय्यद (वय 19 रा. सिन्नर), नफीस शेख उर्फ नफ्या, विजय सुनील माळेकर (वय: 19 रा. पाथर्डी फाटा, दामोदर चौक), रोहित चंद्रकांत पालवे (वय 18 वर्षे रा. एकता सोसायटी मागे पांडवलेणी), नितीन विठ्ठल घुगे (वय: 19 रा. नरहरी लॉन्स, नवले चाळ पाथर्डी फाटा) तसेच दोन अल्पवयीन मुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संशयितांची अधिक चौकशी करत असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करत आहेत. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११४/२०२५)
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात याच ठिकाणी अपडेट होईल…)