नाशिक: घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (प्रतिनिधी): घराच्या खिडकीचे गज कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कामटवाडा येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मंगेश वसंतराव चंद्रात्रे (रा. इंद्रनगरी, कामटवाडा) यांच्या राहत्या घराच्या किचनच्या खिडकीचे लोखंडी गज कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी व लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ४७ हजार रुपये किमतीचे १६.७२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ९० हजार रुपये किमतीच्या ३०.५० ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या, ३१ हजार रुपये किमतीची १२.५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ५७ हजार रुपये किमतीची तीन सोन्याच्या अंगठ्या, ६६ हजार रुपये किमतीच्या १७ नग सोन्याच्या अंगठ्या व ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790