नाशिक। दि. ३ जुलै २०२५: डॉक्टरला हॉस्पिटल बंद पाडण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी डॉ. देवेंद्र निवृत्ती खैरनार (रा. मनोहर गार्डन शेजारी, गोविंदनगर) यांचे हिरवेनगर, वडाळा रोड नागजी सिग्नलजवळ हॉस्पिटल आहे. संशयित आरोपी अजुम मकरानी याने दि. २४ ते ३० जून दरम्यान हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. खैरनार यांना धमकी दिली की, “तुमच्या हॉस्पिटलविरोधात बऱ्याच तक्रारी आहेत, त्यामुळे तुमचे हॉस्पिटल बंद करू’ तसेच “हॉस्पिटल चालू ठेवायचं असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील.” संशयित आरोपीने अशा प्रकारे धमकी देऊन खंडणीची मागणी केली.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात डॉ. खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अजुम मकरानी याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.