जिवेठार मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस अटक !

नाशिक (प्रतिनिधी): जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यापासून फरार असलेल्या संशयित आरोपीस नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

दिनांक २८ जून २०२४ रोजी रात्री फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यास आरोपी सुरेश खंडारे, यश गरूड, दुर्गेश व यश दंडगव्हाळ यांनी नारायणबापुनगर, जेलरोड, नाशिक येथे फिर्यादी यांना जुन्या भांडणाची कुरापत काढुन लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने डोक्यावर, कमरेवर व हातावर मारहाण करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

केदार हे बेशुद्ध पडल्याने त्यांच्यावर जयरामभाई हॉस्पीटल, नाशिकरोड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२४ भा.दं.सहिता ३०७,३२६,३२३, ५०४, ३४ प्रमाणे दि. ०३/०७/२०२४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

हे ही वाचा:  नाशिक: यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बहाण्याने तरुणाची पावणेदोन लाखांची फसवणूक

सदर गंभीर स्वरुपाच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेश दिले होते. सदर गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तीत्व लपवुन व पेहराव बदलुन फिरणारा फरार आरोपी यश दंडगव्हाळ हा उपनगर पोलीस स्टेशन हद्यीतील दसक, जेलरोड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत व अक्षय गांगुर्डे यांना मिळाली.

हे ही वाचा:  ओझर विमानतळावर प्रवाशांची विक्रमी नोंद; एकाच दिवसात १२२८ जणांनी केला प्रवास !

त्याप्रमाणे नाशिक परिसरात आरोपी पकडण्यासाठी सापळा लावला. यावेळी संशयित आरोपी यश महेश दंडगव्हाळ (वय २२ वर्षे रा. फ्लॅट नं. १४, श्री गणेश अर्पा. करंजकरनगर, दसक, जेलरोड, नाशिक) हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात दिसुन आला. त्याला पोलिसांची चाहुल लागताच तो पळुन जात असतांना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले.

पकडलेल्या आरोपीकडे गुन्हयाबाबत चौकशी करता त्याने फिर्यादी यांना धारदार हत्याराने मारहाण केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला तपासासाठी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: सायंकाळनंतर सिटीलिंक बस मार्गात बदल; देखावे बघण्यास गर्दी वाढत असल्याने निर्णय

सदरची कामगिरी संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त नाशिक शहर), प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके (सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उप निरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनिल आडके, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790