Amazon

नाशिक: ‘मी भाई आहे…’ म्हणत सुरक्षारक्षकाला मारहाण; चारचाकी वाहनाच्या काचाही फोडल्या

नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील मेघराज बेकरी येथे सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाला ‘मी येथील भाई…’ आहे असे म्हणत बेकायदेशीर जमाव जमवून बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. संशयिताने एका मोटारीच्या काचा फोडत दहशत माजविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) रात्री साडेबारा वाजेच्या सुमाराला घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

या घटनेत सातपूर कामगार नगर वैभव पार्क सोसायटी येथे राहणारे सुरक्षारक्षक विकी दिलीप मकेश्वर (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाण प्रकरणी त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आठ ते दहा अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर कामगार नगर येथे राहणारे मकेश्वर पेठरोडवरील मेघराज बेकरी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मार्केट यार्डातील दुकानावर FDAचा छापा; ३ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त

गेल्या शनिवारी रात्री मकेश्वर मेघराज बेकरीबाहेर असताना त्या ठिकाणी एक संशयित आला. त्यावेळी मकेश्वर यांच्या नाकावर, डोक्यावर मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर आठ ते दहा लोकांना जमविले. त्यांनीदेखील मकेश्वर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयित आरोपींनी मकेश्वरच्या मोटारीच्या काचा फोडून पलायन केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790