नाशिक: परराज्यातील दोन चोरट्या महिला पंचवटी पोलिसांच्या जाळ्यात; दोन गुन्ह्यांची उकल !

नाशिक। दि. ३० जून २०२६: पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत मध्यप्रदेशातील दोन महिला आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दागिने चोरीसह दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'हरित नाशिक' लोकचळवळ व्हावी; मिशन ग्रीन मॉन्सूनअंतर्गत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

निमाणी बसस्थानक, मार्केट यार्ड आणि पंचवटी परिसरात वाढत्या दागिने चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष गस्त आणि साध्या वेशातील पथकांमार्फत देखरेख वाढवली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिरसाठ व गुन्हे शोध पथकाने तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्याआधारे दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील तीन दिवस 'यलो अलर्ट'

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उषा किशोर सकटे (वय ५०) आणि पूर्णिमा किशोर सकटे (वय ३०) या दोघींचा समावेश असून, त्या मध्यप्रदेशातील देवास येथील रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी पंचवटीतील भाजी मार्केट परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदूर मध्यमेश्वरात ६,२१५ पक्ष्यांची नोंद; ११० सायकलस्वारांची पर्यावरण जनजागृती रॅली

पुढील चौकशीत या दोन्ही आरोपींनी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या घरफोडीच्या आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली असून, या प्रकरणाचाही तपास पुढे सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790