नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२५: एमडी ड्रग्ज विक्री करणारे पेडलर्स स्त्री-पुरुष मागील वर्षभरापासून फरार होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अमली पदार्थविरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित आरोपी दीपाली पाटील ऊर्फ टीना ऊर्फ अंकिता पटेल (४३, रा. सिडको), संशयित किरण खंडू साळुंके (४६, रा. पवननगर) या दोघांना शिताफीने जाळ्यात घेतले.
‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…’ अशी विशेष मोहीम गुन्हेगारांविरुद्ध पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे. तसेच जे गुन्हेगार फरार आहेत, त्यांचाही शोध घेण्याचे आदेश कर्णिक यांनी गुन्हे शाखेसह विविध पथकांना दिले आहेत.
यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल अमली पदार्थाच्या गुन्ह्यात हवा असलेला किरण व टीना यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले. पथकाने सिडकोमधील पवननगर, त्रिमूर्ती चौक, सावतानगर आदी भागात शोध घेतला. हे दोघेही संशयित आरोपी त्यांच्या राहत्या घरी दिवाळीसाठी आले असता पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
![]()
