
नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२५: नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक सांधे बदल शस्रक्रिया विभागाचे उदघाटन अपोलो हॉस्पिटल्स समूहाचे वेस्टर्न रिजन सीईओ श्री. अरुणेश पुनेथा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपोलो हॉस्पिटल्स नाशिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.अनिल जाधव आणि डॉ.भूषण देशमुख, फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शीतल सुरजुसे, निमा नाशिक च्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा वाघ आणि पंचवटी मेडिकल असोसिएशन महिला विभागाच्या प्रमुख डॉ.रोशनी बोरा, अपोलो हॉस्पिटल्स नाशिक चे मार्केटींग हेड देवेंद्र वाघ उपस्थित होते .
ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. अनिल जाधव म्हणाले की “जसजसे वय वाढतं तसतशी हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या बऱ्याच जेष्ठ नागरिकांना उद्भवते. आजकाल बरेच लोक या गुडघेदुखीने त्रस्त असतात. चालायला, चढ उतार करायला किंवा मांडी घालून बसायला- उठायला त्रास होऊ लागतो. पेन किलर व इतर औषधोपचाराचा परिणाम होईनासा होतो तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्ला देतात. हाडांची झीज जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी गुडघा बदलण्याची गरज पडते. या शस्त्रक्रियेत खराब झालेले सांधे बदलून त्याजागी आधुनिक कृत्रिम सांधे बसवले जातात जे पूर्णपणे नैसर्गिक सांध्याप्रमाणे काम करतात ज्यामुळे नियमित चालणे, मांडी घालून बसणे आणि आपली दैनंदिन कामे आधाराशिवाय करणे शक्य होते , पूर्वीपेक्षा गुडघ्याच्या प्रत्यारोपणाच्या शास्त्रक्रियेत खूप सुधारणा झालेली आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच आतील रचना कशी असेल हे कॉम्पुटरवर पाहता येते. चुका टाळता येतात. शस्रक्रिया 100% यशस्वी होण्याचे प्रमाण पण या तंत्रज्ञानामुळे वाढले आहे.
ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. भूषण देशमुख म्हणाले, “गुडघेदुखी जेव्हा असह्य होते, सर्व उपाय संपतात तेव्हाच आपण शस्रक्रिया करण्याचा सल्ला देतो अनेक रुग्णांना भीती वाटते त्यांच्या मनात शंका येतात पण वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैद्यकीय सेवा या दोनही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि अपोलो हॉस्पिटल्स समूह या साठी नेहमीच अग्रेसर आहे , सर्वसामान्यांना परवडेल अशा दारात आम्ही रोबोटिक सांधे बदल शस्रक्रिया करणार आहोत या तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रियेआधी सांध्यांचे थ्री डी मॉडेल बनवून प्रत्येकाच्या शरीरयष्टी प्रमाणे विशिष्ट सर्जरी प्लॅनिंग केले जाते शस्त्रक्रिये शस्त्रक्रियेत अतिशय छोटा काप दिला जातो, यात कोणतीही नस कापली जात नाही किंवा पेशीला इजा होत नाहीआणि यामुळे घुडघ्याचे इम्प्लांट योग्य आणि अचूक जागी प्रत्यारोपण करता येते , रुग्णाची रिकव्हरी लवकर होते , रुग्णाला वेदना कमी होतात , टाके कमी घालावे लागतात आणि रुग्ण पुढच्या २४ तासात स्वतःच्या पायावर उभा राहून चालू शकतो त्यामुळे रोबोटिक सांधे बदल शस्रक्रिया हि जेष्ठ नागरिकांसाठी खूपच फायद्याची आहे आणि त्यासाठी येणार खर्च देखील सर्व सामान्यांना परवडणारा आहे.”
यावेळी बोलताना आपोलो हॉस्पिटल्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा म्हणाले, “अपोलो हॉस्पिटल समूह हा नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आग्रही असतो आणि त्याच बरोबर सर्व सामान्यांना परवडणऱ्या खर्चात आपण अधिकाधिक चांगले काय करू शकतो याकडे आमचे नेहमीच लक्ष असते, पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक साधने बदलण्याची शस्त्रक्रिया विभागाचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होतो आणि या माध्यमातून अपोलो हॉस्पिटल्स नाशिक नी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे ही या तंत्रज्ञानामुळे घुडघे आणि खुब्याचा त्रास असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल.”
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मार्केटींग हेड देवेंद्र वाघ यांनी केले, यावेळी लोकज्योती जेष्ठ नागरिक संघ, आडगाव जेष्ठ नागरिक संघ, कोणार्क नगर जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व पदाधिकारी तसेच अपोलो हॉस्पिटल्सचे कर्मचारी उपस्थित होते.
![]()
