नाशिक: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; प्राणघातक हल्ल्यानंतर फरार पती परभणीतून अटकेत

नाशिक। दि. १४ जुलै २०२६: लग्नाला अवघे दोन महिने झालेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार पतीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने परभणीतून अटक केली. हनुमान त्र्यंबकराव लिंगे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना जय भवानी रोड परिसरात घडली होती. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही; अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा कायम

गुन्हे शाखा युनिट-२चे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना संशयित हनुमान लिंगे हा परभणी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस कर्मचारी संजय सानप, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण आणि मनोज परदेशी यांच्या पथकाला परभणीकडे रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयिताचा माग काढत त्याला त्याच्या मूळ गावी ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२६-२७ लागू खरीप हंगामात ३१ जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन

प्राथमिक तपासात, संशयिताचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तो पत्नीला मूळ गावी घेऊन जाण्याचा आग्रह करत होता. मात्र पत्नीने त्यास नकार दिल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात संशयिताने धारदार शस्त्राने पत्नीच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत महिलेने आईला घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790