नाशिक: रिक्षातून १.८२ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक !

नाशिक। दि. १३ जून २०२५: रिक्षामधून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली असून रिक्षातून १ लाख ८२ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने हिराबाग गंगापूर रोड येथे ही कारवाई केली. वैभव शंकर खरास (रा. म्हसरुळ गाव) असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा रिंगरोडच्या अलाइनमेंट बदलाची उच्चस्तरीय चौकशी करणार

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना रिक्षा (एमएच १५ इएच २०८६) मधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. रिक्षा गंगापूररोडने सातपूरकडे जात असल्याचे समजले. पथकाने सापळा रचला असता हिराबाग येथे संशयित रिक्षा येताना दिसली. रिक्षा थांबवली प्लास्टिकच्या गोणीत गुटखा याबाबत गुटखा मिळून आला. कुणाकडून आणला विचारले असता संशयिताने उडवाउडवीचे उत्तर दिले.

🔎 हे वाचलं का?:  कर्जमंजुरीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी महिला अटकेत

वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, हिरामण भोये, यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून अवैध गुटखाच्या साठेबाजांची नावे निष्पन्न होणार असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790