
नाशिक (प्रतिनिधी): ड्रग्ञ्जमुक्त नाशिक या अभियानाअंतर्गत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने दोन ड्रग्ज पेडलर्सला नांदूर नाका भागात बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीची १३ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे.
एमडी ड्रग्जनिर्मिती करणारे, तसेच ड्रग्ज खरेदी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध साध्या वेशातील गुन्हे शाखेची पथके लक्ष ठेवून आहेत. गुन्हे शाखा युनिट-२ चे हवालदार नितीन फुलमाळी यांना जेलरोड नांदूर नाका भागात ड्रग्ज पेडलर्स येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे, प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार आदींच्या पथकाने सापळा रचला.
यावेळी संत जनार्दन स्वामी पुलाजवळ नांदूर नाका शिवारात संशयित जय सुनील फिरके व अंकुश शांताराम चौधरी (२४, दोघे रा. सामनगाव रोड) हे दोघे संशयित आले. त्यांना पथकाने जाळ्यात घेतले. जयची अंगझडती घेतली असता ४० हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम एमडी पावडर, तर अंकुशजवळ २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम एमडी पावडर सापडली.
![]()


