नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२५: फुलेनगर येथील गोळीबार प्रकरणात चार महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने आडगावनाका परिसरात ही कारवाई केली. ऋषिकेश उर्फ बाबा परसे (२२, रा. कुमावतनगर) असे संशयिताचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या पथकाचे सतीश शिरसाठ, कैलास जाधव, अंकुश काळे, महेश नांदुर्डीकर यांना माहिती मिळाली. गुन्हा घडल्यापासून फरार असलेला परसे आडगावनाका परिसरात येणार आहे. पथकाने सापळा रचला. संशयित माहितीप्रमाणे परिसरात दिसून आला. त्याला ताब्यात घेतले.
संशयिताविरोधात सरकारवाडा, पंचवटी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. जाधव आणि निकम टोळीमध्ये वर्चस्व वाद आणि निकम टोळीच्या किरण निकमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सागर जाधव याच्यावर गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घडला होता.
![]()


