नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 6 नोव्हेंबर रोजी आयोजन

नाशिक। दि. ४ नोव्हेंबर २०२५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक कार्यालयाच्या वतीने गुरूवार 6 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

या मेळाव्यात एकूण 739 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, डिल्पोमा, बीएससी, बीई, डिप्लोमा सर्व ट्रेड, पदवीधर यांना सहभागी होता येणार आहे.

या मेळाव्यात स्पार्क एचआर सोल्युशन, नाशिक, जेके मैनी प्रीसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, हिटाची अस्टेमो इंडिया प्रायव्हेट लि., बजाज सन्स लि., एमडी इंडस्ट्रीज / एमडी ऑटो कंपोनंट, एमएसएल ड्राईव्हलाईन सिस्टिम लि., मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा.लि., नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि, वैष्णवी ऑटो (पी) लि, धुमाळ इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्वीगी लि. अशा एकूण-१४ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या आयोजित मेळाव्यात सहभागी होवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790