नाशिक: खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात १० वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुलाला शाळेतून आई दुचाकीने घरी घेऊन जात असताना सिन्नरफाटा येथे उड्डाणपुलावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत पाठीमागून आलेल्या ट्रकने ठोस मारल्याने दहा वर्षांच्या मुलाचा दुभाजकावर पडून जबरी मार लागून मृत्यू झाला.

चेहेडी पंपिंग येथे राहणारा वरद गणेश चिखले (१०) जेलरोड येथील के.एन. केला शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरदचा पेपर सुटल्यानंतर आई संगीता चिखले या दुचाकीवरून वरदला घेऊन शिवाजी पुतळा येथून उड्डाणपुलावर चढून सिन्नर फाटामार्गे घरी जात होत्या.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

सिन्नर फाट्याकडे जाताना उड्डाणपुलाच्या उतारावरील खड्डे चुकवत असताना पाठीमागून आलेल्या आयशर गाडी (एमएच १४ एलबी ०७२६) दुचाकीला धडक दिल्याने आई संगीता व मुलगा वरद हे खाली रस्त्यावर पडले. वरद रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर पडल्याने त्याच्या डोक्याला व अंगाला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी जखमी वरदला तत्काळ सिन्नरफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने वरदचा दुर्दैवी अंत झाला. तर आई संगीता यादेखील जखमी झाल्या. वरद हा शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी गणेश चिखले यांचा मुलगा होता. या खड्यांमुळे निष्पाप बालक वरदचा बळी गेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आयशर ट्रकचालक अहमद पटेल (रा. कुरकुंडी, पोस्ट घारगाव, ता. संगमनेर) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790