नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा करून कृषी अधिकारी असलेल्या महिला व तिच्या मुलाने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या गंगापूर रोड येथील विश्वस्ताकडुन दहा लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
याबाबत नाशिक शहर पोलिसांनी प्रेस नोट जारी केली आहे. या प्रेस नोटप्रमाणे, फिर्यादी निंबा मोतीराम शिरसाट यांचे फिर्यादी वरून रोख १० लाख रूपये खंडणी स्वीकारताना संशयित आरोपी महिला सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे हिस तिचा मुलगा मोहित बापुराव सोनवणे (वय-२५) यांचेसह अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी निंबा मोतीराम शिरसाट, (वय-५४ व्यवसाय शेती, मुळ राह. देवळा तालुका) येथील रहिवाशी असुन सध्या गंगापुर रोड येथे वास्तव्यास आहेत. ते सन-१९९१ पासुन दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यामिक सेवा केंद्रात धार्मीक कार्यक्रमात सक्रिय सहभागी असल्याने त्यांची अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ह्या न्यासाच्या विश्वत मंडळावर कार्यकारी सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
संशयित आरोपी सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे वय ४२ हया कृषी विभागात अधिकारी पदावर कार्यरत असुन त्या स्वामी समर्थ केंद्राच्या उपासिका आहेत. सन-२०१४-१५ मध्ये आरोपी यांचेवर सिडको परीसरातील ब-याच केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. फिर्यादी व आरोपी यांचे प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे जाणे-येणे असल्याने त्यांची तेथे ओळख झाली होती. फिर्यादी व आरोपी दोघे ही देवळा परीसरातील रहिवाशी असल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांना कसमादे परीसरातील स्वामी समर्थ केंद्राची जबाबदारी घेण्यास विनंती केली. यानुसार फिर्यादी यांनी त्यांना कसमादे परीसरात ४० ते ४५ सेवा केंद्राची जबाबदारी दिली.
सन-२०१८-१९ दरम्यान आरोपी यांनी पतीचे निधन, आजारपण, शेती तसेच लहान मुलांची जबाबदारी इत्यादी कारण सांगुन फिर्यादी कडुन २५ लाख रू. उसनवार घेतले.
तसेच सन-२०१८-१९ मध्ये आरोपी सारीका उर्फ सारीखा बापुराव सोनवणे यांनी स्वत:च्या आर्थीक फायदयाकरीता सकल्प सिध्दी नावाची कपंनी पैसे डबल करून देते असे अमिष दाखवुन सेवेक-याकडुन रकमा जमा केल्या परंतु परत केल्या नाहीत. अश्या तकारी प्राप्त झाल्या. सेवेक-यांच्या रकमा परत करण्यासाठी आरोपी यांनी फिर्यादी यांना वेळोवेळी पैश्याची मागणी केली. आरोपीस मदत म्हणुन फिर्यादी यांनी रु २० लाखाची मदत स्व कमाईतुन केली.
जानेवारी – २०२२ मध्ये आरोपी व तिचा मुलगा यांनी फिर्यादी यांना गंगापुर रोड येथे समक्ष बोलावून धमकाविले की, माझा मुलगा आयटी एक्सपर्ट असुन आम्हास पैसे न दिल्यास तुमचे मॉर्फ व्हिडीओ करून व्हायरल करू, त्यानंतर वेळोवेळी व्हॉटसअप कॉल करून पैसे मागण्यास सुरूवात केली.
जानेवारी २०२३ मध्ये आरोपी यांनी फिर्यादी यांना प्रशांत नगर स्वामी समर्थ केंद्रात भेटुन आरोपीचे मोबाईल मधील व्हिडीओ फिर्यादी यांना दाखवुन मोबाईल परत घेतला व २० कोटी रू. ची मागणी केली अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी घाबरून उसनवारीतून ५० लाख रू. जमवुन आरोपी यांना जेहान सर्कल गंगापुर रोड नाशिक या ठिकाणी गाडी मध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये दिले. त्यावेळी आरोपी यांनी मोबाईल मधील व्हिडीओ डिलीट केल्याचे दाखविले.
परंतु पुन्हा आरोपी यांनी १०, कोटी ५० लाख रू. ची मागणी करून रकम न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी कंटाळुन पोलिसांकडे तकार दाखल केली असता, पोलीसांनी सापळा रचुन आरोपी महिला व तिचा मुलगा मोहीत बापुराव सोनवणे यास १० लाख रू. रोख स्विकारतांना त्रंबकेश्वर नाशिक येथुन रंगेहाथ ताब्यात घेवुन अटकेची कारवाई केली आहे. आरोपी यांचे घरातुन १० लाख रू. रोख, १ लॅपटॉप, ३ अॅपल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी यांनी फिर्यादी कडुन आजपर्यंत १ कोटी ५ लाख रू. घेतलेले आहेत.
याबाबत गंगापुर पोलीस स्टेशन येथे गुरनं २८०/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३८४,३८८, ३८९,५०६, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६(ई), ६७,६७(ए) अन्वये दि. १८/११/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. यागुन्हयात आरोपी महिला व तिचा मुलगा मोहीत बापुराव सोनवणे यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनवणे, हया खंडणी विरोधी पथक यांचे सहायाने करीत आहेत.