Nashik Accidents: समृद्धीच्या शिर्डी ते भरविहिर टप्प्यात वाहनांचे अपघात

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर दरम्यान गेल्या आठवड्यात खुला झाल्यानंतर या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालना येथून भिवंडीकडे जाणारा आयशर टेम्पो वावी जवळच्या फुलेनगर येथे समृद्धी महामार्गावर पलटी झाला.

तर याच ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरावर शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी कार देखील अनियंत्रित दोन्ही मार्गिकांच्या मध्यावर असलेल्या खड्ड्यात गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

समृद्धी महामार्गावर वाहनांकडून वेगमर्यादा पाळली जात जात नसल्याने शिर्डी ते नागपूर दरम्यान असंख्य अपघात घडले आहेत. हीच बाब समृद्धीचा दुसरा टप्पा असलेल्या 80 किलोमीटर अंतराच्या शिर्डी ते भरवीर दरम्यान दुर्लक्षित होत असल्यामुळे गुरुवारी पहाटे या टप्प्यात पहिला अपघात घडला.

हे ही वाचा:  नाशिक: IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी

जालना येथून भिवंडीकडे बांधकाम स्टील घेऊन निघालेला आयशर टेम्पो एमएच 48 / सीक्यू 1283 समृद्धीच्या पॅकेज क्रमांक 12 मधील फुलेनगर येथे आला असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. व क्रॅश बॅरिकेट्स तोडून टेम्पो थेट नदीवरील पुलाला धडकला.

या दरम्यान टेम्पोचा वेग मंदावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर हा टेम्पो थेट 50 फूट खोल नाल्यात पडला असता. सुदैवाने या अपघातात टेम्पो चालक व क्लीनर हे दोघेही बचावले. टेम्पोचे व महामार्ग लगत उभारण्यात आलेल्या क्रॅश बॅरीकेट्सचे या अपघातात मोठे नुकसान झाले.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

दरम्यान अपघाताची माहिती समजल्यावर गोंदे टोलनाका येथील मदत पथक तातडीने अपघात स्थळी पोहोचले. चालकाची विचारपूस करत अपघात झालेले ठिकाण इतर वाहनांच्या लक्षात यावे म्हणून रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले.

दुसरा अपघात याच ठिकाणी पाचशे मीटर अंतरावर सकाळी साडेअकरा वाजता झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी कार क्रमांक एमएच 01 सिव्ही 1410 अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व दोन्ही मार्गिकांच्या मध्ये असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. सुदैवाने या अपघातात देखील कोणी जखमी झाले नाही.

समृद्धीच्या हेल्पलाइनवर चालकाने संपर्क साधल्यावर तातडीने रुग्णवाहिका व मदत पथक अपघातस्थळी आले. प्रवाशांना गोंदे येथील टोलनाक्यापर्यंत दुसऱ्या वाहनातून नेण्यात आले. व क्रेनच्या सहाय्याने खड्ड्यात गेलेली कार बाहेर काढून पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: दस्त नोंदणीसाठी सुटीच्या दिवशीही निबंधक कार्यालये सुरु राहणार

अपघाताची तीव्रता पाहता टेम्पोचा वेग किमान 100 किलोमीटर असावा अशी शक्यता आहे. समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी 80 किलोमीटरची वेगमर्यादा घालून देण्यात आली असली तरी ती पाळली जात नाही.

कारचा वेग देखील निर्धारित 120 किलोमीटर प्रति तास पेक्षा अधिक असावा. टेम्पो चालकाला अपघाताचे कारण विचारले असता आपण 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन चालवत होतो. मात्र, रात्रभर वाहन चालवल्यामुळे डोळ्यांवर ताण पडला व वाहन नियंत्रणा बाहेर जाऊन अपघात झाला असे त्याने सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates