नाशिक: गॅस भरताना ओमनी कारचा स्फोट,दर्शनासाठी निघालेले १० साईभक्त जखमी,चिमुकल्यांचाही समावेश

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत १० प्रवासी भाविक जखमी झाले आहे त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश असून काहींना उपजिल्हा रुग्णालय तर काहींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

चालक अवैध गॅसच्या अड्डयावर गॅस भरण्यासाठी मारुती घेऊन गेला होता गॅस भरत असतांना ही घटना घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथील असल्याची माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीतील साई दर्शनासाठी आलेलं कुटुंब नगरसुल रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. यावेळी नगरसुल येथून दुसऱ्या खाजगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी एक मारुती व्हॅन कार भाडोत्री घेतली होती.

या कारमध्ये गॅस भरत असताना हा भीषण स्फोट झाला. येवला शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या पक्की मज्जिद भागामध्ये ही घटना घडली आहे. जखमींमध्ये 10 व्यक्तींचा समावेश असून चार लहान बालके आहेत. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

चालकाने येवल्यात आल्यानंतर एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅसच्या अड्डयावर गाडी घेऊन गेला. तेथे गॅस भरत असतांना अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणून जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले घटनेनंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
आदित्य अवचारे (वय 11), सीमा कसबे, प्रदीप अवचारे, वैभव लिंबे (वय 22), विराज कसबे (वय 4), प्रतिभा लिंबे (वय 39), वैदही कसबे वय (1.5), अनुष्का कसबे (वय 14), गीता कसबे वय (22).

असे एकूण दहा जणांचा समावेश असून यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती सोनवणे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आर्यन सोनवणे यांनी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790