नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. ६ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. ५ जून २०२६: नाशिक शहर विभाग २ अंतर्गत येणाऱ्या ३३/११ के.व्ही. उपनगर उपकेंद्र अंतर्गत ग्राहकांचा वीज पुरवठा शनिवारी ६ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपनगर विद्युत उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती तसेच जुने ब्रेकर बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याने खालील विद्युत वाहीनीवरील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

यामध्ये पुढील भागांचा समावेश असेल:
👉 ११ केव्ही गांधी नगर वाहिनीवरील: अभिष नगर,पंचशील नगर,दत्त मंदिर,दीप नगर, विद्युत कॉलनी,सहकार कॉलनी, एन के नगर, एलआयजी सोसायटी, छोटी जनता परिसर, संजय गांधी नगर, टागोर नगर, विजय ममता थिएटर, टाकळी रोड परिसर.

👉 ११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीवरील: टागोर नगर , के के वाघ स्कूल, रेयान इंटरनॅशनल स्कूल, डीजीपी नगर, गणपती मंदिर, इरिगेशन कॉलनी, अशापुरा , औरंगाबाद सोसायटी.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

👉 ११ केव्ही समता नगर वाहिनीवरील: उपनगर, शांती पार्क, रामदास स्वामी नगर लेन नंबर १,२व,३ खोडदेनगर, साळवे मळा , इंदिरा गांधी झोपडपट्टी, इंद्रायणी सोसायटी , प्रेरणा सोसायटी, जय भवानी नगर , समता नगर, क्षीरसागर मळा, जामकर मळा, शिंदे मळा व शेलार लॉन्स परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790