राज्याच्या ‘या’ भागांत ३ दिवस पावसाचा इशारा

नाशिक। दि. २८ मे २०२६: २७ मे रोजी मान्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व लक्षद्वीपच्या काही भागांत दाखल झाला. यामुळे हवामानात बदल होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आगामी तीन दिवस ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य वर्षा पर्यटनासाठी तात्पुरते बंद; भूस्खलन, झाडे कोसळल्याने निर्णय

दरम्यान, बुधवारी विदर्भात उष्णतेची लाट कायम होती. ब्रह्मपुरीत ४६.६ तर नाशिक ३६.९ व छत्रपती संभाजीनगरामध्ये ३९.६ अंश कमाल तापमान होते. विदर्भ वगळता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आगामी तीन ते चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790