🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

संपूर्ण राज्यात थंडीचा जोर वाढला; थंडीचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज !

नाशिक (प्रतिनिधी): संपूर्ण राज्यात गारठा वाढला आहे. या हंगामात किमान तापमान प्रथमच दहा अंशांखाली घसरल्याने परभणी, धुळे आणि निफाड येथे हुडहुडी वाढली आहे. नाशिकला मंगळवारी (दि. २६ नोव्हेंबर) १०.८ अंश सेल्सिअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडला किमान ८.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उद्योग सुलभीकरणासाठी उद्योजकांचे अभिप्राय महत्वाचे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

मंगळवारी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांत हुडहुडी वाढत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.सोमवारी उत्तर प्रदेजतील ‘सारसवा’ येथे देशाच्या सपाट भूभागावर नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील यंदाच्या हंगामातील ९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790