Amazon

नाशिककरांना उकाड्यातून काहीसा दिलासा; किमान तापमानात घट

नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२६: शहर आणि परिसरातील हवामानात हळूहळू बदल जाणवू लागला असून, गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. दिवसा अधूनमधून ढगाळ वातावरण, तर मध्यरात्रीनंतर हवेत जाणवणारा गारवा यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळत आहे.

गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) शहरात कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सकाळी हवेतील आर्द्रता ६९ टक्के, तर सायंकाळी ती ३७ टक्के होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 27 ऑक्टोबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

दिवसा उकाडा, रात्री गारव्याची चाहूल:
गेल्या आठवडाभरापासून शहरात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दिवसा घामाच्या धारा आणि उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असताना, आता किमान तापमानात सुमारे एक अंशाने घट होत असल्याने रात्रीच्या वातावरणात काहीसा गारवा जाणवू लागला आहे.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटींमध्ये शासनाकडून शिथिलता!

दिवसा अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असून, तापमानातील बदलामुळे शहरातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

दसऱ्याच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दसऱ्यापर्यंत शहरात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत तुरळक हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये बसस्थानकांवरील दागिने चोरांची टोळी जाळ्यात; 24.43 लाखांचे सोने जप्त

तसेच २१ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ढगाळ वातावरण अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत दिवसा उकाडा आणि रात्री गारवा असे संमिश्र हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790