Amazon

मध्य रेल्वेच्या ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका; दोन एक्स्प्रेस १० तासांहून अधिक विलंबाने

नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२६ : मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासह कसारा यार्डच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेल्या विशेष ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. उत्तर भारतातून मनमाडमार्गे मुंबई आणि पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्या आधीच विलंबाने धावत असताना, या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

१५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या या विशेष ब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या मार्गात आणि वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. आधीच उशिराने धावणाऱ्या गाड्यांना या कामामुळे आणखी चार ते पाच तासांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन एक्स्प्रेस १० तासांहून अधिक उशिराने:
लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या विलंबाचा कालावधी दहा तासांहून अधिक झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

  • निजामुद्दीन–वास्को (गोवा) एक्स्प्रेस : १० तास ५० मिनिटे
  • पुणे–हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस : १० तास ३० मिनिटे
  • दानापूर–पुणे स्पेशल : सुमारे ४ तास
  • पाटलीपुत्र–मुंबई एक्स्प्रेस : १ तास ५५ मिनिटे
🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: ध्वजारोहण सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे- आयुक्त शेखर सिंह

गाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांना स्थानकांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या अद्ययावत वेळापत्रकाची माहिती घेणे आवश्यक आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंतच:
कसारा येथील रेल्वे ब्लॉकचा परिणाम वंदे भारत एक्स्प्रेसवरही होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी मुंबई–नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकापर्यंतच धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी नाशिकरोड येथून नांदेडकडे रवाना होईल.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटींमध्ये शासनाकडून शिथिलता!

या बदलामुळे संबंधित दिवशी मुंबई, नाशिकरोड आणि नांदेडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

स्थानकावर जाण्यापूर्वी लाइव्ह स्टेटस तपासा:
विशेष ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि लाइव्ह स्टेटस तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार प्रवासाची वेळ निश्चित करूनच स्थानकावर पोहोचावे, जेणेकरून अनावश्यक प्रतीक्षा आणि गैरसोय टाळता येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790