राष्ट्रीय लोकअदालतीत 3 हजार 762 प्रकरणे निकाली; 64 कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

नाशिक। दि. १६ मे २०२६: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 3 हजार 762 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  भारतीय वायुसेनेच्या बीआरडी, नाशिककडून भारतीय नौदलाच्या मिग-29 के इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल यशस्वी

लोकअदालमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण 49 पॅनेलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पॅनेल प्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. रोकडे यांच्या मार्गदर्शखाली कामकाज केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दावा दाखपूर्व प्रकरणांमध्ये एकूण 39 हजार 598 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 214 प्रकरणे निकाली निघाली असून रक्कम रूपये 3 कोटी 15 लाख 64 हजार 478 इतकी वसुली झाली. अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणे मिळून एकूण 3 हजार 762 प्रकरणांचा निपटारा होवून एकूण रूपये 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 इतके शुल्क झाली. या रकमे तडजोड रक्कम समाविष्ट आहे.

🔎 हे वाचलं का?:  जनगणना-2027: स्व- गणनेचा आज (दि. १५) शेवटचा दिवस

▪️मोटार वाहन चालकांना दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 2 हजार 487 मोटार वाहन प्रकरणामध्ये 354 प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालीयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

▪️निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 473 प्रकरणे
▪️मोटार अपघात प्रकरणे- 156 प्रकरणे
▪️कामगार विषयक- 1 प्रकरण
▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 32 प्रकरणे
▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 200 प्रकरणे
▪️इतर – 2900 प्रकरणे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790