नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२६: विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची छाननी करताना काही अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर समितीकडून त्याबाबत सूचना पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील लॉग-इनवर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता ऑनलाइन पद्धतीने तातडीने अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान अडचणी निर्माण झाल्यास अथवा जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेश रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अर्जदारांची राहील, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्री. पाटील यांनी कळविले आहे.
![]()


