HSRP नंबरप्लेटबाबत मोठी बातमी; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई (प्रतिनिधी): हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांना बसवणं आता शासनानं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहिम सुरु आहे. यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनानं यासाठीचं परिपत्रक काढलं आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

मुदतवाढीवर शासनाचं म्हणणं काय?:
यासंदर्भात राज्य शासनानं काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनानं मुदतवाढ का देण्यात येत आहे? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. परिपत्रकात म्हटलं की, १ एप्रिल २०२९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण अजूनपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच काम फारच कमी झालं आहे. त्यामुळं जुन्या वाहनांना ही HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

या मुदतवाढीच्या अनुषंगानं सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. तसंच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावं, असं निर्देश या परिपत्रकातून देण्यात आले आहेत. २० मार्च २०२५ या तारखेनं हे मुदतवाढीचं परिपत्रक राज्य शासनानं काढलं आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here