महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. २२) वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या नाशिक शहरातील इंदिरानगर कक्ष अंतर्गत कळविण्यात आले आहे की, उद्या- शनिवारी (दि. २२ मार्च २०२५) ३३ केव्ही भूमिगत केबलचे काम सुरू असून नवीन केबल (भारीत) चार्ज करण्यात येणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शेवटच्या घटकांपर्यंत जलदगतीने सेवा पोहोचवा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

त्यामुळे इंदिरानगर परिसरातील भारत नगर ,दिपाली नगर, इंदिरानगर, खोडे नगर, सुचिता नगर, शनी मंदिर परिसरातील विद्युत पुरवठा केबलच्या कामासाठी शनिवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. १३२ केव्ही टाकळी सबस्टेशन मधून ते कावेरी हॉटेलपर्यंत टाकण्यात आलेली नवीन ३३ केव्ही केबल चार्ज करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रमधून निघणाऱ्या ११ केव्ही भारतनगर, कल्पतरू नगर, दिपालीनगर, शनि मंदिर नगर व अशोका हॉस्पिटल या परिसरातील वीजपुरवठा पुरवठा या वेळेत बंद राहील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790