Breaking: मुंबई-नाशिक महामार्गावर स्विफ्ट कार आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावर स्विफ्ट कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर रविवारी (दि. २१ नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी येथील हॉटेल ग्रीनलँड समोर स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर जोरदार आवाज झाला. शिवाय धडकेनंतर स्विफ्ट कार डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर तर झालाच पण स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोड धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकच्या दातार जेनेटिक्सला US FDA चं ब्रेक थ्रू डेझिगनेशन! Breast Cancerचं त्वरित निदान !
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २१ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू