Breaking: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड, संदीप वाजेचा ‘हा’ साथीदार गजाआड

Breaking: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड, संदीप वाजेचा ‘हा’ साथीदार गजाआड

नाशिक (प्रतिनिधी): डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित पती संदीप वाजे याचा साथीदार बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हसके यास तपासी पथकाने गजाआड केले आहे.

त्यास आज (ता.१७) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

दरम्यान, संशयित संदीप वाजे याची पोलिस कोठडी काल (दि. १६) संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हे ही वाचा:  ओझर विमानतळावर प्रवाशांची विक्रमी नोंद; एकाच दिवसात १२२८ जणांनी केला प्रवास !

त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मोरवाडी (नाशिक) मनपा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. संदीप वाजे यास न्यायालयाने एकूण १३ दिवस पोलिस कोठडी दिली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, तपासी अधिकारी निरीक्षक अनिल पवार व पथकाने महत्वपूर्ण धागेदोरे मिळवित तांत्रिक विश्‍लेषणाच्या मदतीने संशयित वाजेचा साथीदार यशवंत म्हस्के यास बुधवारी (ता.१६) अटक केली.

हे ही वाचा:  नाशिक: फ्लॅट घेण्यासाठी २० लाख रुपये आणत नसल्याने विवाहितेचा छळ

आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संशयित संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयात हजर केले. अॅड. दिलीप खातळे यांनी संशयित आरोपीच्या वतीने बाजू मांडताना पोलिस कोठडी दोन- तीन नव्हे तर १३ दिवस देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिस कोठडी देणे उचित नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत संशयित वाजे यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790