Big Breaking: CBIची नाशकात मोठी कारवाई; लष्कराचा मेजर आणि इंजिनिअर लाच घेताना ताब्यात

Big Breaking: CBIची नाशकात मोठी कारवाई; लष्कराचा मेजर आणि इंजिनिअर लाच घेताना ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने नाशकात पुन्हा मोठी कारवाई केली आहे.

गेल्या कारवाईत सीबीआयने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना ताब्यात घेतले होते. आता सीबीआच्या हाती मोठे मासे गळाला लागले आहेत.

नाशिकमधील लष्कराच्या मेजरसह एका इंजिनिअरला सीबीआयच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

🔎 हे वाचलं का?:  आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा 'यलो अलर्ट'

नाशिकमध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) कार्यरत आहे. याठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचे प्रशिक्षण दिले जाते.

विशेष म्हणजे, याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. आणि याच केंद्रात सीबीआयच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कॅटमध्ये कार्यरत असलेला मेजर हिमांशू मिश्रा (असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर) आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोन्ही एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबआयच्या पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  SIR: चार दिवसांत शंभर टक्के डिजिटायझेशनचे उद्दिष्ट साध्य करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सीबीआयच्या या कारवाईमुळे केवळ कॅटच नाही तर संपूर्ण लष्करामध्येच खळबळ उडाली आहे. लष्करात लाचखोरीची फारशी कारवाई होत नाही. त्यातच या कारवाईत मेजर दर्जाचा अधिकारीच सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, ही लाच किती रुपयांची होती, कशासाठी घेतली जात होती यासह अन्य बाबी अद्याप उघड झालेल्या नाहीत. सीबीआयचे पथक अद्याप कॅटच्या आवारातच असून दोघांसह अन्य बाबींची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अधिक बाबी उजेडात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790