महापालिका अधिकार्‍यांकडून कर्मयोगीनगर, गोविंदनगरमध्ये समस्यांची पाहणी

समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना अहवाल देणार

नाशिक, दि. १३ (प्रतिनिधी) – प्रभाग २४ मधील विविध समस्यांबाबत गुरुवारी महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी कर्मयोगीनगर, गोविंदनगर भागात पाहणी करून माहिती घेतली.

समस्यांचा अहवाल आयुक्तांना देण्यात येईल, विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशी हजर होते.

प्रभाग क्रमांक २४ मधील रस्ते दुरूस्त करावेत, पावसाळी गटारी टाकाव्यात, आरक्षित जागेवर पार्क विकसित करावे, सिटी सेंटर मॉल सिग्नलवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

याची दखल घेत गुरुवारी, १३ ऑक्टोबर २०२२ रोजी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ, उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी यांनी कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, गोविंदनगर भागात पाहणी केली. संपूर्ण प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रस्ते, पावसाळी गटारी व अन्य सुविधांसह विकासकामांकरिता अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यासाठी आयुक्तांना अहवाल देण्यात येईल. गतिरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नयनतारा सिटी-२ जवळील दुभाजक काढून बडदेनगरकडे जाण्यासाठी सरळ मार्ग करण्यात येईल. सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील पुलाच्या रुंदीकरणासाठी अहवाल तयार करण्यात येईल. इंडिगो पार्कसमोरील नाल्यावरून गोविंदनगरकडे जाण्यासाठी बारा मीटर रस्ता तयार करण्यासाठी, तसेच बाजीरावनगर रस्त्याचे रुंदीकरण करून तो चोवीस मीटर करण्यासाठी आयुक्तांना अहवाल देण्यात येईल.

कर्मयोगीनगर येथील ब्लू बेल्स इमारतीजवळील नाल्यावरील छोट्या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही या अधिकार्‍यांनी दिली. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, विनोद पोळ, बाळासाहेब दुसाने, धवल खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, प्रज्ञा मालपुरे, मीरा सूर्यवंशी, अरुणा मालपुरे, जया पाटील, कमल दिघे, नम्रता बाविस्कर, जया सोनवणे, जयश्री शिरोडे, वैशाली देवरे, उषा पैठणकर, मंगला बागुल, विजया जाधव, शोभा शेळके, वंदना शेवाळे, प्रतिभा निकुंभ, संध्या पवार, सुवर्णा सोनवणे, कुसुम देवरे, जयश्री राठोड, मिनाक्षी लाडे आदींसह रहिवाशी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790