पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित !

नाशिक (प्रतिनिधी): डॉ.सिताराम कोल्हे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर) यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी  स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर माननिय राष्ट्रपती महोदय यांचें गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना साथीमुळे पदक अंलकरण समारोह आयोजित करण्यात आलेला नव्हता.

दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजभवन मुंबई येथे माननिय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते १५ ऑगस्ट २०२० व २६ जानेवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती महोदय यांची पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांना देखील सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

डॉ.सिताराम कोल्हे यांची सन १९९१ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. सन १९९२-९३ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी मधुन एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी लोहमार्ग नागपूर, नाशिक ग्रामीण विशेष सुरक्षा पथक, जळगाव, गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक आणि सध्या नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी ते आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. सीताराम कोल्हे यांनी “क्रिमिनल सायकॉलोजी”मध्ये पीएचडी मिळविली आहे !

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यांना आजपर्यंत ३० वर्षाचे सेवा कालावधी मध्ये अतिशय क्लिष्ट, किचकट असे खून,दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील गुन्हेगार अटक करुन कौशल्य पुर्ण तपास केल्याने  गुन्हेगार यांना न्यायालयातून शिक्षा लागली आहे. त्यांचे सेवाकलावधी मध्ये आतापर्यंत ७०० + बक्षीसे व १२५ +प्रंशसापत्रे मिळाले आहेत व १ मे २०१६ रोजी त्यांनां गुणवत्ता पुर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले होते.  राजभवन येथे अतिशय दिमाखदार  सोहळ्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790