नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात हळूहळू घसरण होत असल्याने थंडीत वाढ होत आहे. आगामी दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, निफाड, जळगाव येथे किमान तापमानात घसरण झाल्याने गारठा वाढला आहे. शुक्रवारपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही किमान तापमानात घसरण झाल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरात मिथिली चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याचे केंद्र हे ओडिशाच्या परादीपपासून २५० किलोमीटर दूर आहे. मात्र, या चक्रीवादळाचा भारतावर परिणाम होणार नाही.
प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सियस):
निफाड १२ उदगीर १७ बीड १८ धाराशिव १८ माथेरान १९ बारामती १५ सोलापूर १९ नाशिक १४ अहमदनगर १३ पुणे १५ परभणी १८ कोल्हापूर १९ महाबळेश्वर १६ जळगाव १५ सातारा १६ छत्रपती संभाजीनगर १६