नाशिक: मस्ती करतो म्हणून मावशीने दिले बालकाला चटके; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): मस्ती करतो म्हणून साडेचार वर्षीय बालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या तळहातावर गरम तव्याचे चटके दिल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील चाईल्डलाईनच्या सुपरवायझर सायली जयदीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी दाम्पत्य हे आगरटाकळीतील समतानगर येथे राहते. हे दाम्पत्य त्या बालकाचे मावशी व काका लागतात. संशयित महिलेकडे त्यांच्या लहान बहिणीला दुसरे मूल झाल्याने तिने तिच्या साडेचारवर्षीय मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याला तिच्या मोठ्या बहिणीकडे चार महिन्यांपूर्वी पाठविल्याचे समजते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

दरम्यान, हा बालक मस्ती करतो, म्हणून दोघांनी त्याला अनेकदा समजावण्याचे प्रयत्न केले; मात्र त्याच्यात काहीच बदल होत नसल्याने संतापाच्या भरात आरोपी दाम्पत्याने संगनमत करून काल (दि. 17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास या बालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्या तळहातावर गरम तव्याने चटके दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790