Breaking: कसारा घाटात ब्रेक फेल होऊन ट्रक- बसचा भीषण अपघात ; ३  जण जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक- मुंबई महामार्गावरील कसारा घटात बस आणि दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ड्रायव्हरसहित २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. घाटामध्ये अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ओव्हरटेक करून जात असताना पुढे जाणाऱ्या बस व भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

सुदैवाने या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गालगत असलेल्या नाल्यात वळवली. ज्यामुळे मोठी जिवितहानी टळली.

या अपघातात बसमधील ड्रायवरसह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या बसमधून एकूण ४० ते ५० प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बसने इच्छित स्थळी केले रवाना करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

दरम्यान, या अपघातात भंगार घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात पलटी झाल्याने पूर्ण रस्त्यावर भंगार पसरुन येणा- जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच रस्त्यावरील ट्रक व पसरलेले भंगार बाजूला करून वाहतूक केली सुरळीत करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790