नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी वेटर अटकेत; क्षुल्लक कारणावरून घडली घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवर महिरावणी येथे २६ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात त्र्यंबकेश्वर पोलिसांना यश आले. पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी हॉटेलच्या वेटरला अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये RTOची धडक मोहीम; ४३ हजार वाहनचालकांवर कारवाई

क्षुल्लक कारणातून वेटरने या अनोळखी युवकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मण शंकर जाधव (३२, रा. फुलेनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिरावणी येथे एका युवकाचा खून झालेला मृतदेह आढळून आला होता. पथकाने मृतदेहाची ओळख पटवत तपास केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात

पोलिस तपासानुसार, लक्ष्मण जाधव हा युवक त्र्यंबकेश्वर येथील नातेवाइकाकडे राहण्यास आला होता. पायी जात असताना संशयित नीलेश सुरेश नांदे (रा. मोखाडा) याने लक्ष्मण जाधवला हटकले. या प्रकारामुळे संतापलेल्या जाधवने शिवीगाळ केल्याने संशयित नांदे याला राग आला.

संशयित नांदेने चाकूने वार करत त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह झाडीत लपवला आणि तो पळून गेला. त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकाने परिसरातील हॉटेल, ढाबे व चहाच्या दुकानांवर तपास केला असता संशयिताचे नाव निष्पन्न झाले. पोलिस या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790