Breaking: नाशिक सातपूर MIDC तील कंपनीत भी’ष’ण स्फो’ट; 6 कामगार भा’ज’ले

नाशिक : सातपूर MIDC तील कंपनीत भी’ष’ण स्फो’ट; 6 कामगार भा’ज’ले

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकच्या सातपूर  भागात ललित हायड्रोलिक्स या कंपनीत स्फो’ट होऊन येथील काम करणारे ६ कामगार हे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे..

🔎 हे वाचलं का?:  आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा 'यलो अलर्ट'

सातपूर एमआयडीसी येथे ललित हायड्रोलीक या कंपनीत सायंकाळच्या सुमारास अचानक स्फो’ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत येथे काम करणारे ६ कामगार हे जखमी झाले असून यातील दोघा जखमी कामगारांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजतंय. देविदास पवार, चंद्रकांत निमसे, सूरज पेखळे, राम कुमार, लखन पांडे, कृष्ण मुरारी, असे जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. टेस्टिंग करत असतांना नायट्रोजन गॅसचा स्फो’ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  SIR: चार दिवसांत शंभर टक्के डिजिटायझेशनचे उद्दिष्ट साध्य करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8161,8173,8175″]

स्फोट इतका भ’यं’क’र होता की या कंपनीतील काही पत्रे उडून गेले होते. स्फोटाच्या आवाजाने कंपनीत आणि आजूबाजूच्या परिसरात भिती पसरून एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येतेय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि सातपूर पोलिस ठाणे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तर स्फो’टा’मुळे लागलेल्या आगीवर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळवले असून सातपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790