Amazon

दिवाळी-भाऊबीजेसाठी रेल्वेचा दिलासा; भुसावळ-देवळालीदरम्यान दोन दिवस विशेष मेमू

नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२६: दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते देवळालीदरम्यान विशेष अनारक्षित मेमू रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी १० आणि ११ नोव्हेंबर २०२६ रोजी धावणार असून, सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'या' ठिकाणी उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन; ९९.९९ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-देवळाली विशेष मेमू (अनारक्षित) गाडी या दोन्ही दिवशी भुसावळ स्थानकातून सकाळी ९.१५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी देवळाली-भुसावळ विशेष मेमू गाडी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देवळाली कॅम्प येथून दुपारी १.३० वाजता रवाना होईल. ही गाडी सायंकाळी ५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  अन्न भेसळखोरांना FDA चा दणका! नाशिक विभागात १२० आस्थापनांचे परवाने निलंबित; ३.७८ कोटींचा साठा जप्त

या स्थानकांवर मिळणार थांबा:
या विशेष मेमू गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, नाशिकरोड आणि देवळाली येथे थांबे देण्यात आले आहेत. १२ डब्यांच्या या अनारक्षित गाडीमुळे भुसावळ, जळगाव, नाशिक आणि परिसरातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणची ‘अभय योजना’ जाहीर! थकित वीजबिलांवरील व्याज-दंड १००% माफ; मूळ रकमेतही २०% पर्यंत सूट

दिवाळी आणि भाऊबीजेनिमित्त गावी जाणाऱ्या तसेच नातेवाइकांकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790