नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): मद्याचे अतिसेवन करण्यास भाग पाडून तरुणाचा त्याच्या सहकारी मित्रांनी खू’न केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाच्या आईने याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सात संशयितांच्या विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात खु’नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रमिला महानकर (रा. उमरी, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा अंकित दिनकर महानकर हा त्र्यंबकरोडवरील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो सातपूर कॉलनी येथे रूम घेऊन रहात होता. त्याचे सहकारी मित्र व मैत्रिणी संशयित ऋचा महेंद्र भारती, नमिता राधेश्याम मिश्रा, ऋषभराज वीरेंद्रकुमार सिन्हा, लक्ष ललित जयस्वाल, मोनिका शिरीष वळवी, ऋषिकेश विश्वनाथ दराडे यांच्यासोबत नेहमी भांडण होत असे.
संशयितांनी त्याच्या साईगार्डन सोसायटी, गुलमोहर कॉलनी येथील रूमवर पार्टी करण्याचा बहाणा करत मुलाला नशा करण्यास भाग पाडून त्याला मारल्याचा आरोप न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात केला होता. न्यायालयाने संशयितांच्या विरोधात खु’नाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
बायोडिझेल पंपावर छापा; माजी आमदाराचा भाऊ चालवत होता हा पंप!
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा