द्वारका परिसरातील तीन ट्रॅव्हल्स ऑफिस सील

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना मनपा प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहेत. विविध प्रकारच्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत असलेल्या शासन निर्देशाचे पालन न केल्याने व रात्री ८ वाजे नंतर आस्थापना सुरू ठेवल्याने द्वारका परिसरातील ३  ट्रॅव्हल्स सील करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

शासनाने ठरवून दिलेल्या कालावधी पेक्षा जास्त कालावधी आस्थापना सुरू ठेवून नियमांचे पालन न केल्याबद्दल सोमवारी रात्री द्वारका परिसरातील सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स, शताब्दी ट्रॅव्हल्स आणि एके ट्रॅव्हल्स या अस्थापना सुरू असल्याने परिसराचे नोडल अधिकारी उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या पथकाने या तीन ट्रॅव्हल्सवर कारवाई करीत हे ट्रॅव्हल्स सील करण्याची कार्यवाही केलेली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790