नाशिक: ट्रकचालकाला फायटरने मारहाण करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

नाशिक। दि. २२ नोव्हेंबर २०२६: वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून ट्रकचालकाला फायटरने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद जैद नुरुलहसन खान (वय २१), मोहम्मद फैज नुरुलहसन खान (वय २०) आणि अब्दुर रहमान अब्दुल समद (वय ३९, तिघेही रा. अंबड लिंक रोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच १५-एलजी’नवीन मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू

ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड लिंक रोडवरील आझादनगर परिसरात घडली. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून संशयितांनी ट्रकचालकासोबत वाद घातला. त्यानंतर फायटरने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-२ चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयित अंबड लिंक रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या 'या' विविध भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२) बंद राहणार...

ही माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय सानप यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित परिसरात शोधमोहीम राबवून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790