Amazon

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा

पुणे/ नाशिक। दि. ८ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

मंडळाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्ध केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'या' ठिकाणी उभारणार ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन; ९९.९९ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येतील.

प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही निश्चित:
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी याच स्वरूपाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त; 'या' आस्थापनेचे प्रमाणपत्र निलंबित... FDA ची धडक कारवाई !

विषयनिहाय वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध:
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत वितरित करण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम मानावे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच व्हॉट्सॲप किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790