Amazon

नाशिकमध्ये २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त; ‘या’ आस्थापनेचे प्रमाणपत्र निलंबित… FDA ची धडक कारवाई !

नाशिक। दि. ६ नोव्हेंबर २०२६: सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वडनेर दुमाला येथील ‘मे. श्री बालाजी लाडू’ या आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली. अस्वच्छ वातावरणात लाडूंची निर्मिती व साठवणूक होत असल्याचे आढळल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बाजारपेठेतील गर्दीमुळे सिटीलिंक बसच्या 'या' मार्गांत बदल

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाकडून अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत वडनेर गेट येथील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या मे. श्री बालाजी लाडू (घर क्रमांक ४२८/५८६, वडनेर दुमाला, नाशिक) या आस्थापनेची तपासणी करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 9.91 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

या तपासणीदरम्यान आस्थापनेत अन्नपदार्थांची निर्मिती आणि साठवणूक अस्वच्छ परिस्थितीत होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच तयार करण्यात आलेल्या मोतीचूर लाडूंच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात आला. लाडूंमध्ये अन्नरंगाचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्याचीही शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकूण २५८ किलो मोतीचूर लाडूंचा संशयित साठा जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत ६४ हजार ५०० रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पाच मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई

अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि श्रद्धा राहिंज यांनी ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790