Amazon

नाशिक: सीमकार्ड परस्पर पोर्ट करून वृद्धाच्या खात्यातून पाच लाख लंपास

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: मोबाइल सीमकार्ड परस्पर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये ऑनलाइन काढून घेतल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. तपोवन रोड परिसरात राहणाऱ्या ६७ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची फसवणूक झाल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल सेवा बंद झाल्यानंतर प्रकार उघड:
तक्रारदार अनेक वर्षांपासून एका खासगी मोबाइल कंपनीचे सीमकार्ड वापरत होते. अचानक त्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद पडली. तसेच गुगल पे अ‍ॅप सुरू होत नसल्याचे आणि मोबाइलवर कॉल करण्याची सेवाही बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला मोबाइल सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याचा त्यांचा समज झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष ‘माय स्टॅम्प’चे ३१ ऑक्टोबरला अनावरण

यानंतर त्यांनी संबंधित मोबाइल कंपनीच्या स्टोअरमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावावरील सीमकार्ड अज्ञात व्यक्तीने परस्पर दुसऱ्या कंपनीत पोर्ट केल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे संशय आल्याने त्यांनी तातडीने बँकेत जाऊन खात्यातील व्यवहार तपासले. त्यावेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम ऑनलाइन वर्ग झाल्याचे निदर्शनास आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सातपूरला कंपनीत क्रेनचा धक्का लागून तरुण कामगाराचा मृत्यू

दोन खात्यांमध्ये प्रत्येकी अडीच लाख रुपये:
बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर तक्रारदारांच्या खात्यातून दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे एकूण पाच लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले. हे व्यवहार आपल्या परवानगीशिवाय झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसची दुचाकीला धडक; दोन जखमी

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीमकार्ड पोर्टिंग प्रक्रियेचा गैरवापर करून संशयिताने बँक खात्याशी संबंधित मोबाइल-आधारित पडताळणीचा फायदा घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या फसवणुकीमागील व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790