Amazon

नाशिक: ‘सारथी’तर्फे लक्षित गटाच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

नाशिक। दि. १ ऑक्टोबर २०२६: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि इंडो जर्मन टूल रुम यांच्याद्वारे राज्यातील सारथी संस्थेच्या लक्षित गटातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी विनामूल्य निवासी/अनिवासी पूर्ण वेळ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रशांत जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या लक्षित गटातील समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणेची (सारथी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून १८ ते ३५ वर्षे वयोगटातील आणि दहावी, बारावी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी, पदविका प्राप्त उमेदवारांसाठी प्रशिक्षण होईल.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर: कुशावर्त १ ते ३० ऑक्टोबर भाविकांसाठी बंद

सदरचा प्रशिक्षण वर्ग छत्रपती संभाजीनगर, वाळूंज, पुणे, कोल्हापूर, नागपूर येथे होणार आहे. त्यासाठी https://sarthi.maharashtra.gov.in/ तसेच https://www.igtr-aur.org/ या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. या प्रशिक्षण वर्गाचा पात्र युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790