Amazon

सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे ‘स्वर सावना’चा २६ सप्टेंबरला सांगीतिक कार्यक्रम

नाशिक। दि. २५ सप्टेंबर २०२६: सार्वजनिक वाचनालय, नाशिक आयोजित ‘स्वर सावना’ या मासिक सांस्कृतिक उपक्रमाचा २६ वा पुष्प शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) सादर होणार आहे. ‘रागरंग शब्दगंध’ या संकल्पनेवर आधारित हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ६.३१ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार तसेच अभिजात संगीताची जाण, कलाकारांना व्यासपीठ आणि संगीतप्रेमींना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘स्वर सावना’ हा उपक्रम राबविला जात आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार-गायक संजय गीते आणि युवा गायिका श्रावणी गीते यांच्या गायनाची विशेष प्रस्तुती होणार आहे. संजय गीते यांनी स्वरबद्ध केलेली विविध गाणी तसेच काव्यरचनांचे गायन यावेळी सादर केले जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावना संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके राहणार आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये श्री. अतुल पुराणिक आणि सौ. दोहिता अतुल पुराणिक यांचा समावेश आहे.

कार्यक्रमासाठी की-बोर्डवर जितेंद्र सोनवणे, तालवाद्यावर अनिल गीते व गौरव तांबे, तर निवेदनाची जबाबदारी आरती शिरवाडकर सांभाळणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सावना सभासद तसेच संगीतप्रेमींना या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले असून, कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790