Amazon

डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२६ : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांची मंगळवारी (दि. २२) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

डॉ. नीलेश जेजूरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयाशी संबंधित असून, त्यांची पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर यांनी ६ मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर डॉ. मनीषा यांच्या बहिणीने गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

या प्रकरणात पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. नीलेश जेजूरकर यांना सात महिन्यांनंतर अटक केली. त्यानंतर तपासात डॉ. स्वाती चव्हाण यांचे नाव समोर आल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. न्यायालयाने दोघांना सुरुवातीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

तपासादरम्यान पोलिसांनी डॉ. जेजूरकर आणि डॉ. चव्हाण यांचे मोबाइल फोन तसेच एक सिरिंज जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे आणि घटनाक्रमाची साखळी तपास यंत्रणेकडून जोडली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790