नाशिक: अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

नाशिक | दि. १६ सप्टेंबर २०२६: लैंगिक अत्याचाराच्या आठ गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात भोंदू बाबा अशोक खरात याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला सरकार पक्षाच्या वतीने विशेष नियुक्त सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी विरोध केला असून, बुधवारी (दि. १६) होणाऱ्या सुनावणीत ते न्यायालयासमोर आपली बाजू मांडणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

अशोक खरातविरुद्ध विशेष तपास पथकाने आठ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी गंभीर स्वरूपाचे सहा खटले सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत. तर उर्वरित दोन प्रकरणे अद्याप मॅजिस्ट्रेट न्यायालयात असून, तीही सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सत्र न्यायालयात वर्ग झालेल्या सहा प्रकरणांपैकी एका गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी खरातने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संबंधित गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात आज, १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी बचाव पक्ष तसेच सरकार पक्षाकडून आमनेसामने युक्तिवाद केला जाणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790