गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत

मुंबई/नाशिक। दि. ४ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. 2026 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत; द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: इंडिया स्किल्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी करावी

यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विविध निकषांच्या आधारे अभिप्रायासह गुणांकन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय समिती उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांची शिफारस करणार असून, संबंधित मंडळांची नावे, आवश्यक कागदपत्रे, व्हिडीओ व अभिप्राय यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे; NDRF पथकाकडून जनजागृतीसह प्रात्यक्षिके

स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची तारीख तसेच विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पुरस्कार वितरण समारंभाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असेही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790