नाशिक: सीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ.. जाणून घ्या नवे दर

नाशिक। दि. १ सप्टेंबर २०२६: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमार्गे होणाऱ्या एलएनजी वाहतुकीवर निर्माण झालेला परिणाम यामुळे जागतिक बाजारात ‘स्पॉट एलएनजी’च्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधनांच्या तुलनेत सीएनजीचे दर स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमएनजीएलने अखेर सीएनजीच्या किरकोळ दरात वाढ केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नीट (युजी) परीक्षेच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचा नवीन किरकोळ विक्री दर ९८.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

नाशिक शहरात सुमारे एक लाख सीएनजी वाहने असल्याने या दरवाढीचा मोठा परिणाम वाहनधारकांवर होण्याची शक्यता आहे. त्यातच शहरातील २४ सीएनजी पंपांवर मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने अनेक पंपांवर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमध्ये गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी; दोघांना अटक

दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारकांचा इंधन खर्च वाढणार असून, आधीच पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या वाहनचालकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790